तुझ्या पोटातील माझ्या बाळाला जन्म दे , विवाहित प्रियकर तिच्या घरी गेला अन..

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या राजस्थानमधील जयपूर इथे समोर आलेले असून एका तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन स्वतःवर गोळी झाडलेली आहे यात त्याचा मृत्यू झालेला असून मयत व्यक्ती हा विवाहित होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट केली त्यामध्ये आपल्या आत्महत्येला पत्नी प्रेयसी जबाबदार आहेत असे म्हटले होते.

उपलब्ध माहितीनुसार , भरत मिश्रा असे मयत व्यक्तीचे नाव असून फेसबुक पोस्टमध्ये त्याने आपली पत्नी कौशल्या सर्वाधिक त्रास आपल्याला देत आहे असे म्हटले होते . भरत याने प्रेयसीच्या दारात जाऊन आत्महत्या केली त्यावेळी त्याची प्रेयसी तिथेच होती . तिच्या उपस्थितीत त्याने स्वतःवर गोळी झाडली मात्र तिने याप्रकरणी पोलिसांना खबर दिली नाही मात्र मृतदेह तिथे आढळून आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.

मयत भरत मिश्रा याने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये , ‘ माझी पत्नी कौशल्या आणि प्रेयसी यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडलेले आहे . पत्नीने माझी सर्व ठिकाणी बदनामी केली त्यामुळे मित्रांसोबत देखील माझा वाद झाला . मला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. माझी पत्नी 9 तारखेला प्रेयसीच्या घरी गेलेली होती . ती प्रेयसीला देखील वाईटसाईट बोलली आणि तिचे ऐकून प्रेयसी देखील मला त्रास देऊ लागली. आमच्यातला वाद वाढत गेला ‘, असे देखील त्याने म्हटलेले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये त्याने आपल्या मुलांची माफी मागितलेली असून अशा परिस्थितीत मी जगू शकत नाही मी एक चांगला बाप बनू शकलो नाही अशी खंत देखील त्याने यावेळी व्यक्त केलेली आहे . प्रेयसीसाठी देखील त्याने ‘ माझ्या मृतदेहाला अग्नी देण्यापूर्वी पत्नी म्हणून सर्व विधी तू पूर्ण कर ..तुझ्या पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे ‘, असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.


Spread the love