‘ तुम्ही त्यात अपयशी ठरलात म्हणून.. ‘ डॉक्टर पतीला नागपूर खंडपीठाचा दणका

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असून अशीच एक घटना नागपूर येथे उघडकीस आली आहे. घटस्फोट मागणाऱ्या डॉक्टर पतिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच दणका देत पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यास डॉक्टरला अपयश आल्यामुळे घटस्फोट मंजूर करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, याप्रकरणातील पत्नीदेखील डॉक्टर असून हे दांपत्य सतरा वर्षापासून वेगवेगळे राहत आहे. सध्या पती नागपूरमध्ये असून पत्नी मध्यप्रदेशात असतात. त्यांचे लग्न 15 फेब्रुवारी 2001 रोजी झाले होते त्यानंतर 26 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना एक मुलगी देखील झाली मात्र त्यानंतर दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी मतभेद वाढत गेले आणि पाच ऑगस्ट 2004 रोजी ते विभक्त झाले.

त्यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न अनेक नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही म्हणून पतीने घटस्फोट मिळावा म्हणून कुटुंब न्यायालयात सुरुवातीला याचिका दाखल केली होती. 3 डिसेंबर 2015 रोजी ती याचिका खारीज करण्यात आल्यामुळे वतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

पतीच्या म्हणण्यानुसार पत्नी सासू-सासर्‍यांची नीट काळजी घेत नाही, त्यांचा मान ठेवत नाही ही आणि ती अत्यंत संशयी स्वभावाची असून तिने सिकलसेल हा आजार आपल्यापासून लपवून ठेवला म्हणून घटस्पोट देण्यात यावा असे म्हटले होते मात्र पतीचे हे आरोप पत्नीने फेटाळून लावले तसेच न्यायालयाने देखील पतिचे आरोप सिद्ध करणारे असे पुरावे मिळून आले नाही म्हणून पतीचे अपील फेटाळण्यात आले आहे.


Spread the love