‘ तू काळी आहेस ‘ म्हणून हिणवणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली कायमची अद्दल

Spread the love

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून आपल्या पत्नीला सतत काळ्या रंगावरून टोमणे मारणाऱ्या पतीची महिलेने अमानुषपणे हत्या केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पत्नीने तिच्या पतीचे गुप्तांग देखील कापून टाकलेले आहे. संगीता सोनवानी असे आरोपी महिलेचे नाव असून तिचे वय 40 वर्ष असल्याचे समजते. महिलेने वापरलेले हत्यार देखील पोलिसांनी जप्त केलेले आहे. छत्तीसगढ येथील दुर्ग जिल्ह्यात ही घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव अनंत सोनवानी असे असून लग्न झाल्यापासून अनंत हा सतत त्याच्या पत्नीला तिच्या रंगावरून टोमणे मारत होता. घरातून हाकलून देण्याची तो तिला सतत धमकी द्यायचा. आपला रंग काळा आहे ही बाब आपल्या हातात नाही असे त्याला पत्नी वारंवार पटवून देत होती मात्र त्याचे समाधान होत नव्हते. रविवारी नेहमीप्रमाणे त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे महिलेने संतापून त्याच्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला.

संगीता ही इतकी संतापलेली होती की मयत झाल्यानंतर देखील तिने त्याला मारहाण केली तसेच घरातील चाकू घेऊन त्याचे गुप्तांग कापून टाकले. सदर प्रकार घडल्यानंतर तिने गुन्ह्यात वापरलेले हत्यार अंगणातील विहिरीत फेकून दिले आणि रक्ताने माखलेली साडी पलंगाखाली लपून ठेवली. भांडणांमध्ये आरडाओरडा झाल्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळवली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी संगीता ही पतीच्या मृतदेहाजवळ बसलेली होती. पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली असून घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि रक्ताने माखलेली साडी पोलिसांनी जप्त केली असून संगीता हिला बेड्या ठोकल्या आहेत.


Spread the love