तोंडी ट्रिपल तलाक देऊन त्यानंतर चौघांचे विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून लग्नानंतर अवघ्या एक महिन्याच्या आतच विवाहितेला तोंडी तलाक देऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना बीड येथील बीड मामला परिसरात घडली. यावरून बीड पोलीस ठाण्यात पती सासरा सासू विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न व मुस्लिम महिला अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सौबीया सरफराज मोमीन ( वय 19 ) असे विवाहितेचे नाव असून 22 ऑक्टोबर 2019 रोजी याचा सौबीया हीचा सरफराज याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर महिन्याच्या आतच सासरच्या मंडळींनी तिला जिवे मारण्याच्या धमक्या सुरू केल्या आणि दरम्यानच्या काळात तिला मारझोड देखील करण्यात आली.

18 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता पती सरफराज याने पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत फारकत दिली आणि त्यानंतर दुपारी खोलीमध्ये ती एकटी असल्याचे पाहून पती, सासू, सासरा आणि मोठा दीर हे सगळे तिच्या खोलीमध्ये घुसले आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. आपल्या सोबत झालेल्या या प्रकाराने विवाहिता घाबरून गेली आणि तिने या चार जणांच्या विरोधात बीड ठाण्यात गुन्हा दाखल केला. वृत्त लिहीपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती


Spread the love