
अत्यंत वेगळे प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत असून धुळे जिल्ह्यात धांदरणे येथे एक महिला शेतात कामासाठी गेलेली असताना अचानकपणे अजगराने महिलेला विळखा घातला आणि त्यानंतर महिला घाबरून गेली याचा फायदा घेत अजगराने तिच्यावरील आपली पकड वाढवली मात्र काही वेळानंतर या अजगराने आपली पकड सोडून देत तेथून पलायन केले मात्र महिलेने त्यावेळी प्रतिकार न करता मरून गेल्याचे नाटक केले होते.
उपलब्ध माहितीनुसार, येथील सिद्धार्थनगर परिसरात राहत असलेल्या सुशिलाबाई ब्राह्मणे ( वय 58 ) असे या महिलेचे नाव असून शेतमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. याच कारणासाठी त्या सुलावडे येथील एका शिवारात गेलेले असताना गवत कापत असताना अचानकपणे एका अजस्त्र अजगराने त्यांना विळखा घातला. सदर प्रकार लक्षात आला तोपर्यंत अजगराने आपली पकड जबरदस्त केलेली होती त्यामुळे त्या घाबरून गेल्या मात्र त्यांनी जमिनीवर झोपून घेतले त्यानंतर अजगराने मोठा फूत्कार करत त्यांच्या पायाला विळखा घातला आणि त्यांनी मरून गेल्याचे नाटक केले .
आपली शिकार काहीच हालचाल करत नाही हे अजगराच्या लक्षात आल्यानंतर त्याने विळखा थोडा सैल केला आणि तिथून निघून गेला. अजगर गेल्याचा अंदाज येताच सुशिलाबाई देखील जागेवरून उठल्या आणि तात्काळ घरी येऊन त्यांनी घडलेली घटना आपल्या परिवाराला कथन केली. सुशिलाबाई यांनी प्रतिकार केला असता तर कदाचित अजगराने विळखा सोडलाच नसता आणि त्यांना त्यात जीव गमवावा लागला असता मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे .