तो आला अन ‘ गैरकृत्य ‘ करून गेला , पुण्यातील प्रकार

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून महिला अत्याचाराच्या देखील अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक विनयभंगाची घटना पुणे नजीक पिंपरी येथे उघडकीला आली असून घराबाहेर तसेच घरात घुसून एका व्यक्तीने महिलेसोबत गैरकृत्य केले. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी पोलिसांनी एक जणाला अटक केली असून ही घटना देहूरोड येथे दोन वेळा घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, साहेबराव घनवट ( वय 57 राहणार देहूरोड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या घराबाहेर थांबलेली असताना आरोपी तिथे आला आणि फिर्यादीसोबत गैरकृत्य करून निघून गेला त्यानंतरही दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या घरात कोणी नसताना आरोपी तिच्या घरात आला आणि गैरकृत्य करत तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.


Spread the love