‘ तो तुझा कि माझा ‘ भर रस्त्यात तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या : पहा व्हिडीओ

Spread the love

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम राहिलेला नाही अशीच एक घटना उत्तराखंड येथील हल्डवानी येथे उघडकीला आलेली असून एका तरुणासाठी 2 प्रेयसीमध्ये रस्त्यावरच जोरदार भांडण सुरू झाले आणि त्याचे हाणामारीत रूपांतर झाले .उत्तराखंड येथील हल्डवानी परिसरात हिरानगर पोलिस चौकीच्या अंतर्गत येणाऱ्या एका विभागात हा प्रकार उघडकीला आला आहे.

एका प्रियकरासाठी दोन तरुणी रस्त्यात भिडल्या आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर सोबत असलेल्या इतरही काही मुलींनी भांडणात पुढाकार घेतला आणि एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन त्यानंतर लाठ्याकाठ्याने देखील मारहाण करण्यात आली. सदर घटनेचा कोणीतरी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवला आणि बघता बघता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

पोलिसांना घटनेची माहिती समजताच हिरानगर पोलिस चौकीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत दोन्ही गटाच्या या तरुणी फरार झाल्या होत्या. दोन तरुणीमध्ये एकच प्रियकर असल्याने तो नक्की कुणाचा यावरून त्यांच्यात वाद होता आणि त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीवी फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे मात्र अद्यापपर्यंत दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली नाही.


Spread the love