
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोहर भिडे ब्राह्मण समाज आणि सरस्वती पूजा यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली होती त्यानंतर जोरदार वादंग निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी ,’ मनोहर भिडे मनोहर कुलकर्णी आहेत खरं आहे की नाही ते सांगा . सतत ते वाटेल ते बडबडतात. जर ते मनोहर कुलकर्णी असतील तर संभाजी नाव घेऊन महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य का करतात ? खास त्यांच्यासाठी त्यांनी संभाजी नाव घेतले आहे का . त्यांचे खरे नाव काय आहे ? अशी नावे या समाजामध्ये नसतात एवढेच माझं म्हणणं होतं ‘ असे त्यांनी म्हटलेले आहे .
छगन भुजबळ म्हणाले की , ‘ घरात कोणाची पूजा करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही . माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे . माझ्या घरात देखील देवी देवतांची पूजा केली जाते. महात्मा फुले काम करत होते त्यावेळी ब्राह्मण समाजातील समाजसुधारकांनी देखील त्यांना मदत केलेली होती . कर्मठ ब्राह्मण्यवाद परिस्थिती का होती ? हे मी सांगत होतो . शाळा कॉलेजच्या मुलांसमोर बोलणं स्वाभाविक आहे त्यात कोणाला राग येण्याचे कारण नाही . बाकीच्या धमक्यांना मी घालत नाही . जे घाणेरड्या शिव्या देतात त्यांना ब्राह्मण म्हणायचं आम्ही ? ‘ असा देखील खडा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की , ‘ मी ब्राह्मण आहे म्हणता आणि अतिशय घाणेरड्या भाषेत शिव्या देता त्यांना ब्राह्मण कोण म्हणणार ? जे घाणेरड्या शिव्या देतात त्यांना ब्राह्मण म्हणायचं आम्ही ? . ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांच्याबद्दल बोलतोय मी . मी चुकलो असेल तर पोलिसांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी. कोणी चुकत असेल कायदा हातात घेत असेल तर त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतील ‘, असे देखील ते पुढे म्हणाले.