त्याला वाचवण्यासाठी ट्रक लोटला अन प्राण सोडला , पुण्यातील दुर्दैवी घटना

Spread the love

पुण्यात एक धक्कादायक अशी दुर्दैवी घटना हिंजवडी इथे समोर आलेली असून कामावर जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिली म्हणून तरुण दुचाकीवरून पडून ट्रकच्या मागील चाकाखाली चेंगरला गेला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 23 तारखेला सकाळी साडेसातच्या सुमारास हिंजवडी येथील लक्ष्मीचौकात ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , रामदास दिगंबर वडजे ( वय 27 ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी रंगनाथ रामभाऊ तांबे (वय 45 राहणार भिवंडी वाडा रस्ता जिल्हा ठाणे ) याला अटक केलेली आहे.

रामदास हा रोजगारासाठी म्हणून पुण्यात पिंपरी चिंचवड शहरात आलेला होता. तीन वर्षांपासून शहरात रोजंदारीवर काम करून रामदास आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होता. लक्ष्मी चौकात रंगनाथ यांच्या ताब्यातील ट्रक याची त्याला त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक बसली त्यावेळी रामदास मागील चाकाखाली चिरडला गेला. ट्रकचालक त्यानंतर घाबरून तेथून पळून गेला.

सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती त्यानंतर काही नागरिकांनी रामदास यास चाकाखालून काढण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणात रामदास हा जखमी झालेला होता. जखमी अवस्थेत देखील त्याने जीवाच्या आकांताने मदतीसाठी याचना केली त्यावेळी नागरिकांनी पीएमपीएल बस थांबवली आणि काही प्रवाशांच्या मदतीने ट्रक ढकलला मात्र याच दरम्यान रामदास याची प्राणज्योत मालवली.


Spread the love