दरोडा टाकण्याची भाजपची जुनी सवय पण.., सोनिया गांधी बरसल्या

Spread the love

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला असून ‘ जनतेचे भवितव्य पुन्हा नेत्याच्या आशीर्वादाने ठरत नाही तर जनता आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः घेत असते. जनतेला तुमच्या आशीर्वादाची गरज नाही ‘ अशा शब्दात भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान मोदी यांचे कृपा कर्नाटक वर व्हावी असे वाटत असेल तर भाजपला मतदान करा असे म्हटलेले होते यावर सोनिया गांधी यांनी उत्तर दिलेले आहे.

सोनिया गांधी यांनी 2019 मध्ये शेवटची सभा घेतली होती त्यानंतर तब्बल चार वर्षांनी त्यांची प्रचार सभा झालेली असून काँग्रेस कार्यकर्त्यात यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह होता. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या हुबळी मतदार संघात त्यांनी राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

सोनिया गांधी म्हणाल्या की, दरोडा घालण्याची ही भाजपची जुनी सवय आहे. त्यांनी दरोडा घालत आधी कर्नाटकातील सत्ता बळकावली आणि त्यानंतर भाजपच्या 40% कमिशनच्या माध्यमातून जनतेच्या खिशावर दरोडा घातला. राज्यातील जनता या दरोडेखोरांना 10 मे रोजी उत्तर देईल ,’ असे देखील त्या म्हणाल्या. भाजपचे अध्यक्ष जेपीं नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेत भाजप नेते उघडपणे धमकी देत आहेत त्यामुळे कर्नाटकच्या जनतेने अशा व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे असे देखील त्यापुढे म्हणाल्या.


Spread the love