‘ दुकान खाली करायचे नसेल तर शरीर संबंध ठेव ‘, पुण्यातील प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना पुणे शहरात चक्क कॉफी शॉप चालवणाऱ्या महिलेला महत्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून तिचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीला आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये वडगाव बुद्रुक येथे हा प्रकार घडलेला असून शिवणे येथील राहणाऱ्या 48 वर्षे महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, महेश मुरलीधर शिंदे ( राहणार सहकार नगर पुणे ) असे संशयित आरोपीचे नाव असून वडगाव बुद्रुक येथील शिंदे यांच्या दुकानात महिलेचे कॉफी शॉप आहे. आरोपीने पीडित महिलेला महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगून किचनमध्ये बोलावून घेतले आणि तिच्यासोबत असलेली चाळे करून तिचा विनयभंग केला.

आरोपी याने शॉप खाली करावे यासाठी महिलेला अश्लील शिवीगाळ केली असे देखील पीडितेचे म्हणणे आहे तसेच जर तुला दुकान खाली करायचे नसेल तर तुला माझ्या सोबत शरीर संबंध ठेवावे लागतील असे देखील तो म्हणाला, असे महिलेचे म्हणणे आहे.


Spread the love