
प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक जिल्ह्याची देखील प्रथा वेगवेगळी असते असेच असाच एक प्रकार गडचिरोलीत समोर आलेला असून गडचिरोली जिल्ह्यातील एकरा खुर्द या एटापल्ली गावातील आदिवासी बांधव देवीदेवतांना नैवेद्य म्हणून दारू देत असतात मात्र यामुळे दारूचे उदत्तीकरण होत असून व्यसनाधीनतेमध्ये वाढ होत असल्याकारणाने ग्रामस्थांनी अखेर देवाला दारू देणे बंद करून गोड पदार्थ देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मुक्तिपथ नावाच्या एका संस्थेने दोन दिवसीय बैठक गावामध्ये घेतली होती त्यावेळी गावातील देवांना घरगुती दारू ठेवण्यावर बंदी घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी बांधवांच्या अनेक प्रथांमध्ये सणासुदीला आणि पूजेसाठी देवाला दारू देण्याची प्रथा आहे त्यामुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होते आणि देवाच्या नावाखाली मुबलकपणे दारू वितरित केली जाते त्यातून होणाऱ्या परिणामांची शक्यता विचारात घेता संघटन बैठकीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला असून गाव युवा संघटन बैठक , महिला बैठक गाव , ग्रामसभा यांनी हा निर्णय घेतलेला आहे.