‘ देशी दारू ‘ चे भाग्य उजळलं , चक्क सोन्याच्या दुकानात सुरु होती विक्री

Spread the love

अवैधपणे व्यवसाय करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही भरवसा राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या जालन्यातील परतुर तालुक्यात समोर आलेला असून दुकानाला सराफाचे नाव देत आतमध्ये चक्क दारू विक्री करणाऱ्या एका अड्ड्यावर छापा टाकण्यात आलेला आहे. सोन्याच्या दुकानात देशी दारू आढळून आल्यानंतर पथक देखील चकित झालेले होते.

उपलब्ध माहितीनुसार , मुकुंद किसनराव शहाणे असे या दुकानदाराचे नाव असून साईकृपा ज्वेलर्स नावाने त्यांचे परतूर तालुक्यातील संकनपुरी इथे सराफा दुकान आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दुकानात देशी दारू मिळत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना समजली होती त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पोलीस पथकाने छापा टाकला त्यावेळी सुमारे सहा हजार रुपये किमतीच्या बाटल्या दारूच्या बाटल्या तिथे आढळून आलेल्या आहेत. दुकानदारावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love