देश हादरला..हनीमूनच्या रात्री पती एकटाच नव्हे तर ‘ तब्बल ‘ ,पीडिता म्हणतेय की..

Spread the love

देशात एक धक्कादायक घटना समोर आली असून हनीमूनच्या रात्री लग्न होऊन नवविवाहिता बसलेली असतानाच चक्क पतीसोबत त्याचे दोन मित्र देखील आले आणि त्यांनी आपल्यावर गँगरेप केला असे या नवविवाहितेचे म्हणणे आहे . उत्तर प्रदेशात इटावा इथे ही घटना उघडकीस आली आहे . इटावातील परोली रमायन गावातील पीडित नवरीला बुधवारी रात्री उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या वडिलांनी नवरदेव आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गॅगरेपची तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे .

सदर नवविवाहित महिलेने आपल्या पतीसोबतच त्याच्या दोन अनोळखी मित्रांवरही गॅंगरेपचा आरोप केला असून पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचून महिलेचा जबाब नोंदवला आहे. सदर महिलेचं २८ नोव्हेंबरला लग्न झालं होतं. लग्न झाल्यावर अवघ्या काही दिवसात तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे .

नवविवाहित महिलेच्या आईने म्हटले आहे की, मुलीच्या पाठवणीच्या दिवशीच तिच्या जावयाने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मुलीला नशेचे पदार्थ खाऊ घातले अन तिच्यावर गॅंगरेप केला. मुलीला त्रास असह्य होऊ लागल्याने तिला शहरातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सासरच्या मंडळींनी मात्र मुलीची तब्येत बिघडली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे इतकीच माहिती दिली मात्र जेव्हा माहेरचे लोक दवाखान्यात आले तेव्हा सासरची मंडळी पळून गेलेली होती. डॉक्टरांनी देखील मुलीसोबत रेप आणि मारहाण झाल्याची पुष्टी केलेली आहे .

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,’ बुधवारी उशीरा पोलिसांना माहिती मिळाली की एक नवविवाहित महिला हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यानंतर तिच्या म्हणण्यानुसार तिच्यावर तिचा पती आणि त्याच्या दोन मित्रांनी काही नशेचे पदार्थ खायला देऊन गॅंगरेप केला.’ पोलिसांनी महिलेचा आणि तिच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवला असून तपास सुरु असल्याचे समजते.


Spread the love