
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून औरंगाबाद येथे अशीच एक घटना समोर आलेली असून शेजारी भाडेकरू म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित झालेल्या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
उपलब्ध माहितीनुसार, कृष्णा दत्तात्रय भोजने असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्याला बेड्या ठोकून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कृष्णा भोजणे याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले देखील आहेत मात्र तरीदेखील त्याने वसाहतीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर 2 ऑगस्ट 2019 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान त्याने या मुलीवर विविध ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केले.
पीडित मुलीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असताना त्याने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे पीडित मुलीला आपण फसवले गेल्याची जाणीव झाली आणि तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.