धक्कादायक..विवाहित महिलेला आणखी दोन महिलांनी भुलवले , आरोपी अटकेत

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस उघडकीस आली असून एका विवाहित महिलेचा गैरफायदा घेत दोन महिलांच्या मदतीने तिच्यावर एका तरुणाने अत्याचार केला शिवाय त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत गेले चार महिने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिलेने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तिच्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा अब्रार अहमद मोहम्मद आरिफ अन्सारी तसेच त्याला मदत करणाऱ्या सिमरन अंजुम अन्सारी आणि आणि अफसाना शेख जलील या तिघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेशी आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत त्याचा व्हिडिओ तयार केला आणि पीडित महिलेला तो व्हिडीओ दाखवत धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. त्याच्या या कृत्याला दोन महिलांनी देखील साथ दिली असे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली असून तपास सुरू आहे


Spread the love