
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीला आली असून कोल्हापूर शहरात एका युवकाकडून आत्महत्या करत असताना गळफास तुटला आणि त्यानंतर तो खाली जमिनीवर पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.
कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर येथे ही घटना रविवारी घडली असून दोर तुटल्यानंतर तो खाली जमिनीवर पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर येथे साळोखे पार्क ही घटना घडलेली असून अक्षय गणेश कुचकोरवी (वय २१ ) असे त्याचे नाव आहे.
अक्षय हा अविवाहित असून तो कापड दुकानात कामाला होता. घराची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर होती अशातच त्याच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी त्याने आपल्या राहत्या घरी लाकडी तुळईला दोरीने गळफास बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी दोर तुटल्याने तो खाली पडला आणि जोराचा आवाज आल्यानंतर नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली त्या वेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
नातेवाइकांनी तातडीने त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरु असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नसून त्याच्या पश्चात आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे .