
एक खळबळजनक घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून आतेभावासोबत असलेल्या अनैतिक संबंधाला सतत अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात देगाव येथे 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, 35 वर्षीय असलेला पती हा त्याच्या पत्नीसोबत दोन मुली आणि एका मुलासोबत देगाव येथे राहत असून त्याच्या पत्नीचे नाते आतेभावासोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत असल्याने पत्नी हिला पतीचा अडसर वाटत होता. त्यावरून तिने 20 ऑगस्ट रोजी तिचा पती मिस्त्री कामासाठी बाहेर गेलेला असताना त्याला मारण्याचा कट रचला. पती रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून सासर्याने सुनेकडे विचारपूस केली मात्र तिने काही उत्तर दिले नाही.
परिसरातील नागरिकांना सासर्याने या प्रकाराची कल्पना दिली त्यानंतर नागरिकांनी महिलेच्या पतीचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचा प्रियकर त्याला दुचाकीवरून रिसोडकडे घेऊन गेल्याचे निदर्शनास आले आणि प्रकरण पोलिसात गेले. हे समजल्यानंतर तात्काळ हा प्रियकर शिरपूर पोलिसात दाखल झाला. पोलिसांनी त्याला रिसोड पोलिसांच्या ताब्यात दिले असून प्रेयसीच्या पतीचा आपण गळा आवळलेला असून त्याला झुडपात फेकून दिले आहे, अशी माहिती सांगितली.
पोलिसांनी तात्काळ लोकेशन गाठत झुडपातून महिलेच्या पतीला बाहेर काढले आणि वाशीम येथील खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले. जखमी झालेल्या पतीच्या वडिलांनी अर्थात सासर्यांनी सुनेच्या विरोधात आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केलेले असून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.