नागपूरमध्ये खळबळ..ग्रामीण भागात शंभर रुपयात तरुणींच्या अब्रूची काढली जाताहेत लक्तरे

Spread the love

हातात चार पैसे खुळखुळू लागले की काही व्यक्तींना आपण काहीही करू शकतो असे समजून कुठल्याही पातळीवर जाऊन काहीही गुन्हा करण्याची वृत्ती कधीकधी निर्माण होते . असाच काहीसा प्रकार नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्यात उघडकीस आला असून दैनिक लोकमतने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत सर्जा राजाची शर्यत आणि रात्र झाल्यानंतर बंद केलेल्या शामियानामध्ये चक्क बिन कपड्यांचा डान्स असा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात उघडकीस येत असल्याने डान्स बारच्या ही पुढील पातळी ग्रामीण ठिकाणी गाठली जात असल्याचे दिसून येत आहे.

उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामा अशा जाहिरातीची पत्रके भिंतीवर लावण्यात आलेली आहे. त्यामध्ये सिंपल हंगामा, हॉट हंगामा, नो एंट्री हंगामा, फक्त अठरा प्लस अशी जाहिरात करत त्यासाठी ग्राहक मिळवले जातात. कुही तालुक्यातील मुसळगाव भुगाव तर उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणी या ठिकाणी अशा काही शोचे आयोजन नुकतेच पार पडले होते मात्र कार्यक्रमादरम्यान शो हा केवळ डान्सपर्यंत न राहता तो बिन कपड्याचा शो झाल्याचे समोर आले.

संध्याकाळी सात वाजता नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू झाल्यावर त्या ठिकाणी गर्दी वाढायला लागली आणि बंद शामियानामध्ये 500 पेक्षा जास्त तरुण गोळा देखील झाले त्यानंतर हिंदी गाण्याच्या तालावर तरूण-तरूणी नाचायला लागली आणि आणि काही क्षणांतच तरूणींच्या अंगावरील कपडे गायब झाले, असाच प्रकार तालुक्यातील काही ठिकाणी घडत असून केवळ शंभर रुपयांमध्ये डान्स करणाऱ्या तरुणींच्या अब्रूची लक्तरे काढण्यात येत आहेत. निर्लज्जपणे काही व्यक्ती सदर प्रकार मोबाईल मध्ये शूटिंग करून व्हायरल करत असल्याने या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे.


Spread the love