नागपूर हादरले..उच्चशिक्षित डॉक्टर महिलेची इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका उच्चशिक्षित महिलेने वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्याने एकाकीपणा सहन होत नसल्याने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली आहे . सदर महिला ह्या डॉक्टर असल्याची माहिती समोर आल्यावर परिसरात खळबळ उडालेली असून आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे वडील निवृत्त झालेले असून आई एलआयसीमध्ये नोकरी करते तर भाऊ बेंगळुरूमध्ये नोकरी करतो.

उपलब्ध माहितीनुसार, आकांक्षा या सुरुवातीपासूनच अभ्यास हुशार असल्याने आईवडिलांनी त्यांना डॉक्टर करण्याचे स्वप्न उराशी बाळगत अनंत अडचणींमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. आकांक्षा यांचे एमबीबीएस आणि एमडी केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न देखील झाले मात्र पुढे वैवाहिक आयुष्यात अडचणी सुरु झाल्या आणि आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

पतीपासून विभक्त झाल्यावर आकांक्षा ह्या नागपूर येथील जरीपटक्याच्या नागसेन नगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर त्या राहू लागल्या होत्या . गुरुवारी रात्री ९ वाजले तरी त्यांची हालचाल ऐकू येत नसल्याने आईवडीलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्या बेडवर बेशुद्धावस्थेत दिसल्याने आईवडिलांनी डॉक्टरांना बोलवले मात्र तोवर उशीर झालेला होता. त्या ज्या बेडवर आढळल्या त्याच्या बाजूलाच चार ते पाच सिरिंज पडल्या होत्या. त्यातील दोन रिकाम्या आढळून आल्या आहेत.

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक भावनिक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडतानाच आता कोणताच डॉक्टर माझा उपचार करू शकत नाही, असे लिहून ठेवल्याचे समजते. आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरू नका, असेही त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे . जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय नाईकवाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


Spread the love