नागपूर हादरले..नवविवाहित दाम्पत्याने डोळे उघडले तेव्हा समोर सात जण होते

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून नागपूर शहरातील बेलतरोडी इथे पहाटे घरात घुसून एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सुमारे सात चोरटयांनी लुटले आहे . सोमवारी पहाटे ही घटना घडली असून सदर दाम्पत्य हे नवविवाहित असल्याने त्यांच्याकडे दागिने हाती लागण्याचा चोरट्याने अंदाज असल्यानेच ही चोरी करण्यात आल्याची चर्चा आहे . सर्व दागिने लंपास केल्यावर लगेच पळून न जाता आरोपींनी घराच्या आवारात दारू पिऊन हैदोस देखील घातला.

उपलब्ध वृत्तानुसार, फिर्यादी मंगेश वांद्रे हे नागपुरातील चिंचभवन येथे पुनर्वसन केलेल्या परिसरात आपल्या पत्नीसोबत राहतात. मंगेश हे एका ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करत असून अलीकडेच त्यांचा विवाह झालेला आहे .रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर पती-पत्नी झोपी गेले होते मात्र सोमवारी पहाटे तीनच्या दरोडेखोरांनी स्वयंपाकघराच्या दाराला छिद्र पाडून दाराची कडी उघडली आणि तब्बल सात दरोडेखोरांनी चाकू आणि तलवार घेत घरात प्रवेश केला.

सात दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्यावर त्यातील एकाचा घरातील स्टूलला धक्का लागल्याने स्टूलवर ठेवलेली औषधाची बाटली खाली पडली आणि त्याने पती पत्नी जागी झाले. त्यांनी डोळे उघडले असताना तब्बल सात दरोडेखोर डोळ्यापुढे पाहिल्यावर ते घाबरून गेले आणि या दरोडेखोरांनी आरडाओरड केल्यास गळा चिरून मारून टाकू अशी धमकी दिली. पती- पत्नीच्या गळ्याला चाकू आणि तलवार लावून त्यांच्या अंगावरील दागिने, सोनसाखळी आणि रोकड लुटली. आणि त्यानंतर घराच्या परिसरात दारू पिऊन हैदोस घातला आणि फरार झाले. सदर घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे .


Spread the love