नातू झाल्याचा आनंद ठरला मोजक्या क्षणांपुरताच अन त्यानंतर..

Spread the love

घरात लहान मूल जन्माला आलं की किती आनंद असतो मात्र हाच आनंद एका मोठ्या दुःखात बदलला, अशी एक घटना नाशिक येथे सिडको परिसरात उघडकीला आली आहे. सिडको येथील शुभम पार्क येथे राहणाऱ्या सत्यवान अर्जुन पाटील ( वय 48 ) यांची कन्या बाळंतीन झाली. सगळ्या घरात मोठे आनंदाचे वातावरण असताना अचानक सत्यवान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

उपलब्ध माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून कंपनीतून निलंबित करण्यात आल्याने सत्यवान हे मोठ्या मानसिक दबाव आणत होते त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे तर त्यांना निलंबित करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.

मयत पाटील हे अंबड येथील एका कंपनीत नोकरीला होते मात्र तीन ते चार महिन्यांपूर्वी काही कारणास्तव कंपनीने त्यांना निलंबित केले होते. गुरुवारी दुपारी 31 तारखेला दुपारी पाटील घरात एकटे असताना त्यांनी ओढणीच्या सहाय्याने पंख्याला बांधून घेत गळफास घेतला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अंबड पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.


Spread the love