नात्याला काळिमा..चक्क भाच्याने मामीला ब्लॅकमेल करायला केले सुरु , म्हणायचा की..

Spread the love

देशात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून चक्क भाच्याने मामीसोबत ब्लॅकमेल करत अनैतिक संबध ठेवल्याची घटना समोर आलेली आहे . मध्य प्रदेशात ही घटना समोर आलेली असून नात्याला काळिमा फासला गेलेला आहे . धक्कादायक बाब म्हणजे भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार देखील केला आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील काढले.

31 डिसेंबरच्या संध्याकाळी ग्वाल्हेरमधील हनुमाननगर गोला का मंदिर परिसरात ही घटना घडली होती.सदर प्रकारचा व्हिडीओ शूट केल्यावर भाच्याने मामीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. भाच्यासह इतर आरोपींनी मामीला पुन्हा एके दिवशी आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यासोबत अत्याचार करू लागले. मामीने विरोध केल्यावर आरोपीने मामाच्या मोबाईलवर तिचा न्यूड व्हिडीओ पाठवला. आपल्या पत्नीचा असा व्हिडीओ समोर येताच मामाला धक्काच बसला आणि त्याने गोला मंदिर पोलिस स्टेशन गाठत आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पीडित महिला ही टिकमगड येथील रहिवासी असून तिचे वय २१ वर्षे असल्याचे समजते . ती तिच्या पतीसोबत ग्वाल्हेरमधील गोल का मंदिर येथे असलेल्या हनुमान नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. पीडितेच्या पती शेजारीच मजुरीचे काम करतात आणि तेथून काही अंतरावर तिच्या पतीचा भाचा राहतो. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी भाच्याने मामीला फोन करून काही तातडीचे काम असल्याने घरी येण्यास सांगितले.

मामी जेव्हा भाच्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याचा मित्र आकाश माहूर हाही तिथे होता. दोघांनी मामीला प्यायला पाणी दिलं त्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्याचवेळी भाचा आणि त्याच्या मित्राने मामीवर सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ देखील बनवला. घाबरलेली महिला घरी परतली आणि झाल्या प्रकाराबद्दल तिने कोणाला काही सांगितले नाही मात्र आरोपींनी पुन्हा नऊ जानेवारी रोजी फोन करून महिलेला घरी येऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

भाच्याच्या या मागणीचा मामीने विरोध केला असता चिडलेल्या भाच्याने बलात्काराच्या वेळी मामीचा शूट केलेला न्यूड व्हिडिओ रविवारी मामाच्या मोबाईलवर पाठवला. मामा-मामी दोघांनी गोला मंदिर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.


Spread the love