नात्याला काळिमा..मामीसोबत भाच्याकडून मित्राला मदतीला घेत सगळ्या मर्यादा पार

Spread the love

देशात वेगवेगळ्या आणि विचित्र घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना बिहार राज्यातील पाटणा येथे उघडकीस आली असून पाटणा जिल्ह्यातील फतेपुर येथे मामीच्या प्रेमात पडलेल्या एका भाच्याने मित्राला सोबतीला घेत चक्क आपल्या मामाचा खून केलेला आहे. सदर घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मयत व्यक्तीची पत्नी काजल देवी, भाचा आकाश व त्याचा मित्र अजित कुमार यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही भाच्याच्या प्रेमात पडली आणि त्यातून तिने त्याला हाताशी घेत पतीच्या हत्येचा कट रचला. तिचा पती सूरज हा सहा फेब्रुवारीपासून बेपत्ता होता त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. बराच काळ या मृतदेहाची ओळख देखील पटत नव्हती मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास यश आले .

सूरज हा रेल्वे स्थानकावर काम करत होता. याच दरम्यान त्याची पत्नी आणि त्याचा भाचा यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. सुरज याची पत्नी लवकरात लवकर सुरजला घटस्फोट मागत होती आणि त्याचा भाचा असलेला आकाश याच्यासोबत लग्न करण्यास आता वेळ झालेली होती मात्र सुरज घटस्फोट देत नसल्याने तिने त्याला मदतीला घेत सुरज त्याचा कायमचा काटा काढायचा निर्णय घेतला आणि त्याचा खून केला .


Spread the love