नाशिकमधील पूजा आंबेकरच्या खूनात ‘ अनैतिक ‘ अँगल आला समोर , आरोपी फरार

Spread the love

नाशिक इथे दिवाळीच्या आदल्या दिवशी पूजा आंबेकर (वय २७ ) यांचा खून झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. गंगापूर रोडवरील संत कबीरनगर इथे ही घटना घडली होती. तपास सुरु असतानाच हा खून सदर महिलेच्या दिराने केला असल्याची प्राथमिक माहिती आहे . संतोष आंबेकर हे त्याचे नाव असून तो अद्याप फरार आहे. संशयिताचा हा तिसरा खून असून काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला होता.

संतोष आंबेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील हत्या आणि इतर गुन्हे दाखल आहेत. मध्यवर्ती कारागृहात असलेला संतोष काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर पडला. मृत महिला संशयिताची भावजय असून त्यांच्यात अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पूजा आंबेकर (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी ३ तारखेला रात्री ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आंबेकर आणि संदीप आंबेकर हे भाऊ असून मृत पूजा आणि संदीप यांचा विवाह झाला होता. मात्र संदीप आणि पूजाचे पटत नव्हते त्यामुळे ती दीर संतोषकडेच राहत होती. त्यांच्यात अनैतिक संबंध देखील होते मात्र या दोघांमध्ये आर्थिक कारणातून सातत्याने वाद होत होते. संशयिताने आई व बहिणीला पैसे दिल्यावरून त्यांच्यात वाद झाले आणि किरकोळ वादानंतर संतप्त झालेल्या संशयिताने पूजाच्या शरीरावर तब्बल तीस वेळा वार केले आणि तो फरार झाला.


Spread the love