नाशिक हादरले..अखेर विवाहबाह्य संबंधांची तिने कबुली दिली मात्र केले ‘ भयावह कांड ‘

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक इथे उघडकीस आली आहे .चेहडी पंपिगरोड परिसरातील एका आईनेचे प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांना सांगूनही लक्ष दिले जात नसल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशान्वये मुलाची आई आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चेहडी पंपिगरोड परिसरातील रहिवासी प्रशांत रणशिंगे व पूनम यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला काही काळ सुखाचा गेल्यावर या दाम्पत्याला एका मुलगा देखील झाला मात्र त्यानंतर काही कालावधीत बायकोचे पाऊल वाकडे पडत आहे हे पतीच्या लक्षात आल्यावर पतीने तिचा मोबाईल चेक केला असताना त्यात आपली पत्नी ही विशाल गीते नावाच्या व्यक्तीशी सतत बोलत असते हे पतीच्या ध्यानी आले.

पतीने मोबाईल तिच्याकडून घेऊन त्यात असलेले आक्षेपार्ह असे मेसेज पत्नीला समोर घेऊन वाचून दाखवले अखेर तिने आपल्या विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली मात्र तरीदेखील संसार सुरु राहावा म्हणून नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला मात्र गेल्या १५ नोव्हेंबर रोजी प्रशांत कामावरून दुपारी घरी आला असता मुलगा श्रवण हा खेळण्यासाठी गेल्यावर पुन्हा आला नसल्याचे दिसले.

बायको पूनमही घरात दिसत नव्हती व तिचा फोन बंद होता त्यामुळे आजूबाजूला चौकशी केली असता एक इसम मुलाला घेऊन गेल्याचे समजले सोबतच घरातील रक्कम देखील गायब होती. प्रशांतने पैशांसाठी मुलाच्या जिवाला धोका असल्याचा विचार करून पोलिसांकडे धाव घेतली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. प्रशांत यांनी अखेर न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात पूनम प्रशांत रणदिवे व विशाल चंद्रभान गिते (रा. गिते मळा, चेहडी) यांच्या विरोधात मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.


Spread the love