नाशिक हादरले..आयपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याची अमानुषपणे हत्या, तब्बल ‘ इतके ‘ वार करून…

Spread the love

देशात सगळीकडे दिवाळीचा उत्सव सुरु असतानाच नाशिक इथे मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली असून आरपीआयची पदाधिकारी असलेल्या महिलेची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर असं असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा आंबेकर ह्या आरपीआयच्या महिला पदाधिकारी होत्या.

प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली आहे की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले असून त्यांच्या सोबत राहणाऱ्या इसमानेच त्यांची हत्या केली असल्याचा संशय आहे.

संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत तरीदेखील हा आरोपी पूजा आंबेकर यांच्या सोबत राहत होता. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संशयित आरोपीचा शोध सुरु असल्याचे समजते. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


Spread the love