पंधरा दिवसासाठी पती पहिल्या पत्नीकडे रुजू , सगळाच गोंधळ झालाय आयुष्यात

Spread the love

विवाहबाह्य संबंधातून एक अजब प्रकरण सध्या समोर आलेले असून सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील हे प्रकरण असून उज्जैनमध्ये दोन बायकांचा अखेर एकच पती ठेवण्याचा निर्णय कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होता मात्र अखेर कौटुंबिक समुपदेशन केंद्राने हा अनोखा तोडगा काढलेला आहे ज्यायोगे पतीला दोन्ही पत्नीसोबत टप्प्याटप्प्याने राहता येईल.

सदर व्यक्ती आणि त्याच्या दोन पत्नींमध्ये पंधरा वर्षांपासून हा वाद न्यायालयात सुरू होता मात्र अखेर कौटुंबिक न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना सदर व्यक्तीला त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहावे लागेल मात्र हा निर्णय न्यायालयाने देण्याच्या आधीच या व्यक्तीच्या आयुष्यात दुसरी एक पत्नी आली अन तिला त्याच्याकडून दोन मुले देखील झाली. न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी पहिली पत्नी पुन्हा पतीच्या घरी आली आणि कुटुंबात कलह निर्माण झाला.

पहिली पत्नी घरी आल्यानंतर दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी कुटुंब समुपदेशन केंद्रात त्यांना पाठवून दिली. समुपदेशन केंद्रात प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेर महिलेच्या पतीने पंधरा दिवस पहिल्या पत्नीसोबत रहावे. उर्वरित पंधरा दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहावे असा सल्ला दिला आणि तो दोन्ही पत्नींना पटलेला आहे त्यानंतर हा पती आता पहिल्या पत्नीकडे पंधरा दिवसांसाठी रुजू झालेला आहे .


Spread the love