पत्नीने ‘ आज नको ‘ म्हटल्यावर पतीने केल्या क्रौर्याच्या मर्यादा पार

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना हिंगोली इथे उघडकीस आली आहे. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीला चक्क सिगारेटचे चटके देत अँटीसेप्टीक लिक्विड पाजले असल्याचे पीडित पत्नीचे म्हणणे आहे . सातत्याने अशा त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने ( वय २४ ) मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पतीसह 9 जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर गुन्हा हिंगोली पोलीस ठाणे हद्दीत घडलेला असल्याने तिकडे वर्ग केला आहे .

पीडितेच्या म्हणण्यानुसार , लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस चांगले दिवस गेले मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी काही ना काही कारण काढून छळ करायला सुरुवात केली. लग्न जुळले त्यावेळी आपला पती शिक्षक असल्याची देखील खोटी माहिती आपल्याला देण्यात आली होती मात्र आपली फसवणूक करण्यात आली म्हणून आपण आपल्या नवऱ्याशी बोलणं बंद केलं तर आरोपी पती लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेवर दबाव आणू लागला. पीडितेनं लैंगिक संबंधासाठी नकार दिल्याच्या कारणातून आरोपी पतीने तिच्यावर विविध पद्धतीने अत्याचार करणे सुरु केले. आरोपीनी 24 वर्षीय पीडित विवाहितेला सिगरेटचे चटके देत अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं

पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहिता अखेर मुंबई इथे आपल्या माहेरी निघून आली आणि तिने माहेरच्या मंडळींच्या सल्ल्याने मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पतीसह एकूण नऊ जणांविरोधात फसवणूक आणि छळ केल्याची फिर्याद दाखल केली . शिवडी पोलिसांनी हा गुन्हा हिंगोली पोलिसांकडे वर्ग केला असून तपास सुरु आहे .

पती आकाश वाघमारे, बळीराम वाघमारे, राज टापरे, आदित्य वाघमारे, गंगाराम खिल्लारे, विजय खिल्लारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यासोबत अन्य तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील बावनखोली परिसरातील रहिवासी असणाऱ्या आकाश वाघमारे याने आपण शिक्षक असल्याची खोटी माहिती देऊन मुंबईतील शिवडी येथील रहिवासी असणाऱ्या तरुणीसोबत विवाह केला होता.


Spread the love