पत्नीला माहेरी पाठवत दुसरे लग्न उरकून म्हणाला ‘ सॉरी ‘ , पत्नी म्हणतेय की..

Spread the love

महाराष्ट्र एक वेगळीच घटना समोर आलेली असून हॉटेलच्या कामासाठी मला मुंबई येथे जायचे आहे असे सांगून विवाहितेला माहेरी पाठवून दिले आणि ती माहेरी गेल्यानंतर पतीने लातूर येथे जाऊन दुसरे लग्न केले. सोलापूर येथील ही घटना असून तीन जणांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय बाळकृष्ण ठेंगील ( राहणार राघवेंद्रनगर सोलापूर ), नणंद स्वाती सचिन हराळे, अश्विनी सिद्धेश्वर सरवदे ( राहणार सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी किरण धनंजय ठेंगील ( वय 29 राहणार राघवेंद्र नगर सोलापूर ) हिचा विवाह 3 डिसेंबर 2009 रोजी धनंजय ठेंगील याच्यासोबत झाला होता त्यानंतर २०१५ साली त्यांना मुलगी झाली म्हणून धनंजय याने पत्नीसोबत भांडणे सुरू केली तसेच ‘ तू काळी आहेस अडाणी आहेस तुझा माझा संबंध संपला तू मला घटस्फोट देऊन टाक. मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे ‘, असे म्हणत तिचा मानसिक छळ सुरू केला त्यानंतर किरण हिला माहेरी पाठवून पती सासू सासरे आणि दोन नणंद यांनी लातूर येथे जाऊन धनंजय ठेंगील याचे अंबिका बंडगर हिच्यासोबत लग्न लावून दिले.

दुसरे लग्न केल्यानंतर धनंजय याने किरण ठेंगील हिच्या घरी जाऊन माफी मागितली आणि पुन्हा नांदायला ये असे सांगितले त्यानंतर किरण त्याचे ऐकत नसल्याचे पाहून दुसऱ्या पत्नीला पुन्हा लातूरला पाठवून देतो, असे देखील तो म्हणाला त्यामुळे किरण ही नांदायला गेली. दुसरी पत्नी देखील तिला घरीच आढळून आली म्हणून किरण काही दिवसापूर्वी पुन्हा माहेरी आली. पुन्हा सासरी जायचे म्हटल्यानंतर ‘ तू जर येथे आली तर आम्ही सगळे आत्महत्या करू ‘ अशी देखील तिला धमकी देण्यात आली होती त्यानंतर तिने पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला असून तपास सुरू असल्याचे समजते.


Spread the love