‘ पाटीलकी ‘ कामाला आली अन एका महिलेचे वाचले प्राण , महाराष्ट्रातील घटना

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात येथे गिधाडे इथे उघडकीला आली असून तापी नदीवरून उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न असलेल्या एका महिलेचे प्राण वाचवण्यात तावखेडा येथील पोलीस पाटील असलेले महेंद्र पाटील आणि योगेश पाटील यांना यश आले आहे. योग्य वेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची समजूत काढत तिला आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त केले आणि शिंदखेडा पोलिसांनी तिला समज देऊन घरी पाठवून दिले.

महेंद्र पाटील आणि योगेश पाटील हे दुपारी शेतीची कामे आटोपून शिरपूर येथे जात असताना एक वाजण्याच्या सुमारास एक महिला तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली आणि महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले सदर महिलेने आपण शिंदखेडा येथील राहणारे असून आपल्याला तीन मुले आहेत असे सांगत रडायला सुरू केली.

सदर घटनेची माहिती पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांना देण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले. त्यावेळी महिलेची समजूत काढत तिला आत्महत्या करून कोणते प्रश्न सुटत नाही. घरातील प्रश्नही एकमेकांशी बोलून सामोपचाराने सोडवावे लागतात त्यामुळे पुन्हा आपण असे काही करणार नाही, अशी लेखी हमी घेऊन घरी पाठवून देण्यात आले. योग्य वेळी पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेतल्याने एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.


Spread the love