
सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून फिरोजपुर येथील हे प्रकरण आहे. गेल्या काही दिवसात पावसाने राज्यात देशात धुमाकूळ घातलेला असून नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे दरम्यानच्या काळात भारतातील तरुण पावसामुळे नदीतून वाहत गेले आणि अखेर ते पाकिस्तानमध्ये पोहोचलेले आहेत. पाकिस्तानने या प्रकरणाची माहिती दिलेली असून भारत-पाकिस्तान सीमेवरील गजनीवाला गावात हे दोन तरुण आढळून आलेले आहेत.
पाकिस्तानी रेंजर्सने यासंदर्भात माहिती दिलेली असून भारतीय अधिकाऱ्यांना त्यांना घेऊन जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे सांगण्यात आलेले आहे . भारतीय अधिकारी त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असून दोन्ही तरुण हे लुधियाना येथील रहिवासी असून ते श्रीहरमंदिर साहेब येथे जाण्यासाठी त्यांच्या घरून निघालेले होते.
दोन्ही तरुण त्यांच्या इच्छित स्थळी जात असताना नदी पार करत असताना पाण्यात वाहून गेले आणि चक्क पाकिस्तानमध्ये पोहोचले. सध्या दोघेही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात असून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये त्यांना परत पाठवण्याविषयी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.