पुणेकरांवर ‘ बिटकॉइन ‘ ची मोहिनी , पोलीस हवालदारालाच मोह नडला अन..

Spread the love

सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सध्या पुणे जिल्ह्यात सुरू असून एका ट्रेडिंग वेबसाईटवरून गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल असे सांगत चक्क एका पोलीस हवलदारालाच सुमारे 32 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे . अनोळखी मोबाईल नंबर आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आलेली असून अवघ्या चार महिन्यात आरोपींनी ही रक्कम लंपास केलेली आहे. सायबर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आधी देखील अशीच आणेल प्रकरणे समोर आलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यावर परतावा मिळेल असे आमिष तक्रारदार व्यक्ती यांना दाखवण्यात आलेले होते त्यानुसार त्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात गुंतवणूक केली त्यानंतर त्यावर परतावा देखील मिळाला म्हणून फिर्यादी यांचा विश्वास बसला आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने करत सुमारे 32 लाख 22 हजार रुपयांचे बिटकॉइन विकत घेतलेले होते . पैसे काढण्यासाठी म्हणून ते गेले त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बिटकॉइन प्रकरणच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार पुण्यात यादी देखील समोर आलेले असून धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदार व्यक्ती हे पोलीस हवलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या व्यवसायात गुंतवणुकीच्या उद्देशाने चक्क काही नातेवाईकांकडून देखील पैसे घेतलेले होते आणि पत्नीचे देखील दागिने गहाण ठेवून या व्यवसायात गुंतवणूक केली मात्र अखेर त्यांची फसवणूक झालेली आहे.


Spread the love