पुणे नगर श्रीरामपूरपर्यंत बाईकवर मित्रासोबत जायचा मात्र जाताना रस्त्यात ‘ भलताच उद्योग ‘

Spread the love

नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडत असताना रस्त्यावरील एका सजग नगरकराने आरोपीचा मोबाईल मध्ये फोटो काढला आणि पोलिसांनी या फोटोच्या आधारे शोध घेत पुण्यातून कुख्यात दरोडेखोर सफिर उर्फ शब्बीर फिरोज खान इराणी याला दोन दिवसांपूर्वी शिताफीने जेरबंद केले. सफिर याने त्याच्या एका साथीदारांसह नगरमध्ये दोन वेळा रस्ता लूट केल्याचे पोलिसांना सांगितले आहे मात्र त्याने आणखी गुन्हे केले असल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सफिर हा पुणे येथील रहिवासी असून तो पुणे येथून मोटरसायकलवर त्याच्या एका साथीदारासह नगरला यायचा, नगरमध्ये आणि रस्त्यात एकदा रस्ता लूट केली की तो श्रीरामपूर येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी जायचा. तिथे काही दिवस राहिल्यानंतर पुन्हा पुणे येथे जायचा, अशीही माहिती समोर आली आहे. पुणे परिसरातील विविध पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत. नगर परिसरातील धूम स्टाईल चोरी प्रकरणी व इतर चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विशेष पथकाची स्थापना केलेली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजू वाघ ,हेडकॉन्स्टेबल संजय खंडागळे, तोफखाना ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके आदींच्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील इराणी कॉलनी कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.


Spread the love