
पुणे परिसरात एका धक्कादायक घटना समोर आली असून पिंपरी इथे एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले आणि त्यातून पीडित तरुणी गरोदर राहिल्याने गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला लावून तिचा तब्बल तीन वेळा गर्भपात केला. वाकड येथे १५ जानेवारी ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत वाकड येथे हा प्रकार घडला असून आकाश बुचडे (वय २६, रा. मारुंजी) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीसोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. लग्न करण्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एकत्र राहू, असे सांगून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तरुणीसोबत सतत हा प्रकार झाल्याने त्यातून पिडीत तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली. तरुणाने तिला तीन वेळा बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खायला लावून तिचा गर्भपात केला.