पुणे ब्रेकिंग..पेंटींगच्या व्यवसायातील लॉस भरून काढण्यासाठी ‘ अशी ‘ शक्कल मात्र..

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून पेंटिंग काम करणाऱ्या व्यक्तींनी व्यवसायात लॉस झाल्यानंतर चोरीचे दागिने विकत घेऊन ते विक्रीला सुरुवात केली होती मात्र त्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सर्वजण उत्तर प्रदेश येथील असून पुण्यात येऊन रंगकाम करत होते मात्र त्यात तोटा झाल्याने त्यांनी हा पर्याय निवडला.

उपलब्ध माहितीनुसार, राज गौतम ( राहणार गोकुळ नगर मूळ राहणार उत्तर प्रदेश ), विजय शिवमुरत रामकुमार ( वय 20 राहणार गोकुळ नगर मूळ राहणार उत्तर प्रदेश ) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल आणि एक दुचाकी असा दोन लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट तीन यांनी जप्त केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी आठ गुन्हे केलेले आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून युनिट-3 शाखेच्या पथकाला यासंदर्भात माहिती मिळाली होती तेव्हा त्यांनी राम मोबाईल शॉपी परिसरात रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता त्यावेळी ते हाती आल्यावर त्यांच्याकडील पिशवीत बारा मोबाईल आढळून आले तेव्हा त्यांनी हे मोबाइल आपण लोकांच्या हातातून जबरदस्तीने चोरलेले आहेत असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या .


Spread the love