पुणे ब्रेकिंग..शाळकरी मुलीचे अपहरण करून स्वतःच्या घरात डांबले , आता म्हणतोय की..

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून पुणे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुन्हा एकदा पुण्यात समोर आले असून एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण करून चक्क तिला स्वतःच्या घरात डांबून ठेवण्याचा संतापजनक प्रकार वानवडी परिसरात उघडकीला आलेला असून जर तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना ठार मारून टाकेल अशी देखील धमकी यावेळी तिला देण्यात आली. धमकी देणाऱ्या तरुणाचे वय 18 वर्ष असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही अल्पवयीन असून तिच्यावर या मुलाचे एकतर्फी प्रेम होते. गेल्या काही महिन्यांपासून तो सातत्याने तिचा पाठलाग करायचा. त्यातूनच त्याने शाळेजवळ तिला गाठत माझ्याशी लग्न कर असे एक महिन्यापूर्वी म्हटलेले होते. त्यावेळी त्याने माझे मित्र माझ्यासोबत आहेत अन तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या आई वडिलांना ठार मारेल असे देखील तो म्हणाला होता.

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुलगी एकटी घरात असताना तो आला आणि तिला धमकावून घराच्या बाहेर नेले आणि तिथून त्याने तिच्यासोबत पलायन केले त्यानंतर त्याने त्याच्या घरात तिला डांबून ठेवले होते. घाबरून गेलेल्या मुलीने आपल्या आईला यासंदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले.


Spread the love