
पुणे जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून निराजवळ असलेल्या पिंपळे खुर्द इथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता. सदर व्यक्ती याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आलेले असून या खुनामध्ये मयत व्यक्तीच्या पत्नीनेच मास्टरमाइंड म्हणून भूमिका निभावल्याचे समोर आलेले आहे. घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलेले असून त्यामध्ये मयत व्यक्ती याची पत्नी हिचाही सहभाग आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पिंपळे खुर्द येथील बेंदवस्ती परिसरात 21 तारखेला रात्री आठच्या सुमारास हरीशचंद्र बजरंग थोपटे ( वय 42 वर्ष ) या व्यक्तीचा धारदार शस्त्राने कपाळावर गालावर हनुवटीवर वार करून खून करण्यात आलेला होता. सतीश थोपटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.
संशयित आरोपी असलेला प्रणव ढावरे ( राहणार पाडेगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा ) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली त्यामध्ये मयत असलेले थोपटे यांची पत्नी पूजा हरिश्चंद्र थोपटे हिने धीरज उर्फ बंटी संजय धावरे , निकेश वीरेंद्र सिंग ठाकूर ,सिद्धांत संभाजी भोसले, सुरेश कांतीलाल कडाळे लखन सूर्यवंशी यांच्यासोबत कट रचून सुपारी देऊन हा खून केला असल्याचे समोर आलेले आहे . आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना पोलिसांनी अटक केलेली असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.