पुणे हादरलं..गाडीतच वाद झाल्याने झाडली गोळी म्हणून बाहेर पळाला पण..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पिंपरी चिंचवड इथे गोळीबार होऊन कुख्यात गुंड सागर शिंदे याचा अखेर खून झालेला आहे. सांगवी परिसरात असलेल्या रक्षक चौक भागात ही घटना घडलेली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सागर शिंदे याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आलेला होत्या त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 2013 साली घडलेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात सागर शिंदे हा मुख्य आरोपी होता. योगेश जगताप आणि सागर शिंदे या दोन व्यक्तींमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद होते. एकाच गाडीतून येत असताना त्यांच्यामधील वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर सागर शिंदे याच्यावर गोळी झाडण्यात आली. जीव मुठीत घेऊन तो गाडीतून पळू लागला मात्र त्याचवेळी आरोपीने दुसरी गोळी झाडली आणि त्याचा मृत्यू झाला.

संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली असून फिल्मी स्टाईल पद्धतीने ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सदर प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या हत्येमागे इतरही कुणाचा हात आहे का ? याचा देखील पोलीस सध्या तपास करत आहेत. गोळीबार करणारा मुख्य आरोपी योगेश जगताप हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.


Spread the love