
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण वडगाव मावळ येथे समोर आलेले असून पहिले लग्न झालेले असताना देखील खोटे सांगून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अतिप्रसंग केल्याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जगदीश शंकर भोजने ( वय 32 मूळ राहणार जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी व्यक्तीचे नाव असून वडगाव मावळ हद्दीतील बोराडे वस्ती येथे एका बांधकाम साइटवर आरोपी जगदीश याने एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते त्यानंतर त्याने तुझ्यासोबत लग्न करेल असे तिला आश्वासन दिले आणि अनेकदा तिच्यावर अत्याचार केला असे पीडित महिलेचे म्हणणे आहे . पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.