
शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले मात्र लग्न करण्याची वेळ आली त्यावेळी आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. लग्नाआधीच्या त्या प्रेयसीला जेव्हा हे लक्षात आले त्यानंतर तिने समोरील व्यक्तीला जाब विचारून शिवीगाळ करून जोरदार चोप दिलेला आहे आणि त्यानंतर पोलिसात पीडितेने तक्रार नोंदवली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, 30 वर्षीय तरुणी ही हडपसर येथे राहत असून राहुल शिवानंद भगत ( राहणार वर्धमान टाऊनशिप ससानेनगर हडपसर ) याच्यासोबत या तरुणीचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते त्यातून त्याने या तरुणीला वेळोवेळी ठीकठिकाणी घेऊन जात तिच्यावर सतत अत्याचार केले. तरुणीच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०२० पासून तर मे २०२० पर्यंत म्हणजे सुमारे एक महिना त्याने आपल्यावर वेळोवेळी अत्याचार केले आहेत.
आरोपी शिवानंद ज्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते म्हणून तिने या प्रकाराला संमती दिली मात्र लग्न करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्याने या तरुणीशी संपर्क तोडून टाकला आणि त्यानंतर अचानकपणे दुसऱ्याच एका तरुणीशी लग्न केले. ही गोष्ट समोर आली तेव्हा फिर्यादी असलेल्या या तरुणीने त्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला त्यावेळी आरोपीने फिर्यादी तरुणी आणि तिची आई यांना शिवीगाळ केली . सध्या प्रकरण पोलिसात पोहोचलेले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास करत आहेत.