
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण पुणे जिल्ह्यात समोर आलेले असून शिरूर परिसरातील ही घटना आहे. आपल्या भावाचा राग मनात ठेवून सावत्र भावाने त्याच्या वहिनीची हत्या केली आणि भावावर देखील वार केले मात्र त्यानंतर तो पळून जात असताना शिरूरजवळ त्याचा अपघात झाला आणि त्यात तो मृत्युमुखी पडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रियंका बेंद्रे ( वय 28 ) आणि सुनील बेंद्रे ( वय 35 ) अशी या दांपत्यांची नावे असून प्रियंका बेंद्रे या पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये नोकरीला होत्या. एक मे रोजी हे दांपत्य लंडन येथे नोकरी करण्यासाठी देखील जाणार होते मात्र याच कुटुंबातील दुसरा सावत्र मुलगा असलेला अनिल हा पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. त्याच्या विचित्र वागण्यामुळे त्याला तीन कंपन्या बदलाव्या लागलेल्या होत्या . आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी आपला सावत्र भाऊ सुनील याने माहिती पसरवली आणि त्यातून आपले काम गेले असा त्याचा समज निर्माण झालेला होता तर दुसरीकडे सावत्र भावाला लंडनला नोकरी लागल्यानंतर त्याचा जळफळाट मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता.
लंडन येथे इथे सावत्र भाऊ आणि वहिनी जाणार असल्याकारणाने वाद मिटवण्यासाठी म्हणून वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे ( वय 60 ) यांनी अनिल याला समजावून सांगण्यासाठी घरी बोलावलेले होते याचवेळी आरोपी तिथे आला आणि दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली त्यावेळी सुनीलने त्याला सर्व काही व्यवस्थित सांगितले आणि त्यानंतर कुटुंब झोपलेले होते. सकाळ झाल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला त्यावेळी अनिल याने वहिनी प्रियंका आणि सुनील यांच्यावर वार केलेले होते. वडिलांवर देखील वार करण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र त्याला पकडण्याच्या आत तो तिथून पळून गेला होता. प्रियंका यांचा जागेवरच मृत्यू झालेला होता तर सुनील यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी घटनास्थळावरून पळाला आणि त्यानंतर दुचाकीने जात असताना न्हावरा चौफुला रस्त्यावर एका स्विफ्ट कारने त्याला उडवले त्यात तो गंभीर जखमी झाला . त्याच्यावरही ससून इथे उपचार सुरू होते मात्र याचदरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचे भाऊ असलेले सुनील यांची देखील प्रकृती सध्या गंभीर असून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करत असल्याची माहिती आहे.