पुणे हादरलं..विषारी औषध पिल्याचा त्याचा व्हिडीओ पाहिला अन..

Spread the love

पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून विषारी औषध पिल्याचा एक व्हिडिओ मोबाईलवर पाठवून एका प्रियकराने तरुणीला आत्महत्येची धमकी दिली मात्र दुसरीकडे ही तरुणी घाबरून गेली आणि तिने सासवड रस्त्यावरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी प्रियकराच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अक्षय अरुण जोरे ( राहणार भेकराईनगर हडपसर ) असे आरोपी प्रियकराचे नाव असून तरुणीच्या आईने लोणी काळभोर पोलिसात याप्रकरणी तक्रार दिलेली आहे. मयत तरुणी ही कोंढवा परिसरात राहिला होती . तिचे अक्षयसोबत प्रेमसंबंध होते. अक्षय तिला लग्नासाठी सातत्याने धमकावत होता. माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल असे देखील तो सांगायचा.

अक्षय याने मोबाईलवर विषारी औषध पिऊन आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडिओ तिला पाठवलेला होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होईल याचा या तरुणीने धसका घेतला आणि सासवड रोडवरील वडकी भागातील एक खोली लॉजमध्ये एक खोली घेतली आणि तिथे पंख्याला गळफास घेतला लॉज व्यवस्थापकाने याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर तिचा मृतदेह उतरवण्यात आलेला असून आरोपी प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.


Spread the love