पुणे हादरलं..शेतमजूर कामगारात भांडण झालं अन त्यानंतर..

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून इंदापूर तालुक्यातील बेडशिंग नावाच्या गावात जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मजुराने दुसऱ्या मजुराचा डोक्यात कोयत्याने वार करत खून केलेला आहे. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुभम लालजी भारतीय ( वय 35 ) असे खून झालेल्या शेतमजुराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील इलाहाबाद जिल्ह्यातील मेजाखास तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी नीरजकुमार लालमनी कुशवाह हा देखील त्याच गावचा रहिवासी असून इंदापूर पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याची बारा एकर जमीन फिर्यादी व्यक्ती असलेले निलेश मारुती जांभळकर ( वय 32 वर्ष राहणार राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ) यांनी वाट्याने करायला घेतलेली आहे. जमिनीत काम करण्यासाठी शेतमजूर म्हणून उत्तर प्रदेशातील चार कामगार काम करत होते.

एक सप्टेंबर रोजी दुपारी जेवण बनवण्यावरून नीरज कुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर हा वाद जांभळकर यांनी मिटवला देखील होता. गावात सुरू असलेल्या महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचे त्यांनी जेवण सोबत देखील घेतले मात्र रात्री उशिरा साडेबारा वाजताच्या सुमारास घराच्या स्लॅपवर शुभम याचा खून करण्यात आला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.


Spread the love