
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने विवाहित महिलेवर सतत पाळत ठेवून तिचा नंबर हस्तगत केला आणि त्यानंतर तिच्याशी संपर्क वाढवून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर जवळपास सहा महिने बलात्कार केला.
पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा त्याने त्याचा व्हिडीओ काढला आणि त्याचा आधार घेत तसेच तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची आरोपीने धमकी देत 2019 पासून पुढील सहा महिन्यांपर्यंत देहूरोड आणि तळेगाव दाभाडे परिसरात आपल्यासोबत हा घृणास्पद प्रकार केले असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे .
उपलब्ध माहितीनुसार , मानतेश नाईकोडे (रा. गुलबर्गा, विजापूर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून 32 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर चालू असलेल्या बांधकामाच्या स्लॅबवरून तो फिर्यादीवर पाळत ठेवत होता आणि त्यातून त्याने या महिलेसोबत बोलणे करून तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करून जवळीक वाढवली. भेटण्याचे निमित्त करून पीडितेला तिच्या राहत्या घरी आणि तळेगाव येथील सागर लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
आरोपीने फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले आणि महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिला असता तिच्या तोंडावर थुंकून, शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले असून पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले तपास करीत आहेत.