पुणे हादरले..दोन चिमुकल्यांचा खून करून फरार झालेली आई लोणावळ्यात सापडली

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे . रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा आईनेच खून केला असल्याची घटना मुळशी तालुक्यातल्या शिरवली येथे घडली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर ही निर्दयी आई निघून गेली आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याने पौड पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आईला ताब्यात घेतले आहे . खून करून ही आई लोणावळा इथे निघून गेली होती.

उपलब्ध माहितीनुसार, पूना संजय सोलंकी (वय २४ वर्ष) असे या महिलेचे नाव असून तिने रागाच्या भरात मोठी मुलगी चंदा संजय सोलंकी (वय ३ वर्षे ६ महिने) व मुलगा आनंद संजय सोलंकी (वय २ वर्षे) यांचा रस्सीने गळा दाबून खून केला. मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून ती लोणावळा इथे निघून गेली.

आरोपीचा पती संजय जगन्नाथ सोलंकी (वय २५ वर्षे, रा. मुळशी ) याने याबद्दल पोलिसात फिर्याद दिली आहे. ५ जानेवारीला दुपारी ही घटना घडलेली असून प्रकरण उघडकीस येताच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय ढोले यांनी भेट दिली आणि पंचनामा केला. आरोपी आईला लोणावळा येथून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत.


Spread the love