पुणे हादरले..’ पाणी दे ‘ म्हणत घरात आला अन गर्भवती करून गेला

Spread the love

महाराष्ट्रात पुण्यात धक्कादायक घटना समोर आलेली असून पिण्यासाठी पाणी मागण्याचे नाटक करीत एका नराधमाने घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आणि त्यातून ही पीडिता गर्भवती राहिलेली असून आईच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील वाकड येथे घडलेली असून पोलीस त्या युवकाचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मुलगी फेब्रुवारी महिन्यात घरी एकटीच असताना घरासमोर आलेल्या एका २८ वर्षे वयोगटातील युवकाने मुलीला पिण्यासाठी पाणी मागितले. मुलगी घरात पाण्याचा ग्लास आणण्यासाठी गेली असता युवकानेही घरात प्रवेश केला आणि त्याने तिला ठार मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर युवक घटनास्थळावरून फरार झाला मात्र भयभीत झालेल्या मुलीने कुणालाही याबद्दल सांगितले नाही.

काही दिवस गेल्यावर मुलीला पोटात त्रास जाणवू लागल्यावर आईच्या हे लक्षात आल्यावर आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असताना तिने जे सांगितले त्याने आईच्या पायाखालची वाळूच सरकली आणि त्यांनी पोलीस वाकड पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी मुलीला विचारले असताना तिने झालेला सर्व घटनाक्रम कथन केला.

पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आता पोलिस आरोपी युवकाचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Spread the love