पुणे हादरले..पाण्याचा कॅन घ्यायचा म्हणून घरात आले आणि..

Spread the love

पुणे शहरात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून दोन अनोळखी तरुणांनी एका तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केला आणि तिला जाळून टाकण्याची धमकी देत तिला सिगारेटचा चटका देण्याचा देखील प्रयत्न केला त्यानंतर लोखंडी झाऱ्या गरम करून त्याचे चटके देऊन तरुणीवर शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती देखील केली. हिंजवडी येथे पाच तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पीडित 18 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली असून तरुणीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ती घरी आली असताना आरोपी तिच्या पाठीमागे घरी आले आणि तुमच्या रूम मधून पाण्याचा कॅन घ्यायचा आहे असे म्हणून आरोपीने तरुणीच्या घरात प्रवेश केला आणि तरुणीसोबत अश्लील वर्तन सुरू केले म्हणून फिर्यादी यांनी आरोपीप्रतिकार सुरु केला त्यानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला घरात बोलून घेतले.

फिर्यादी तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने तरुणीसोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली आणि तुला जाळून टाकून पेटून देऊ अशी देखील धमकी दिली त्यानंतर पेटलेल्या सिगारेटने तरुणीला चटका देण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने झटका दिल्याने सिगारेट खाली पडली त्यानंतर आरोपींनी झाऱ्या गॅसवर गरम केला आणि तरुणीच्या हातावर चटका दिला असे त्यांचे म्हणणे आहे.


Spread the love