
पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून डेक्कन जिमखान्यावरील एका स्पामध्ये आलेल्या तरुणीच्या मानेचा मसाज करताना तेथील कर्मचार्याने तरुणीसोबत विकृत कृत केल्याचे तरुणीचे म्हणणे आहे . डेक्कन पोलिसांनी मंदार साळुंखे या कर्मचार्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हडपसर येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने आरोपीच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेल्या असताना काम करणारा मंदार साळुंखे या कर्मचारी तिच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान वर केली असताना आरोपीने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला आणि अंगाला जाणीवपूर्वक नको तेव्हा हात लावून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.