पुण्यातील प्रकरण.. ‘ शादी ‘ वर ओळख अन पोलीस स्टेशनमध्ये ‘इंडिंग ‘

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय तरुणीची 24 लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. आरोपीने सेंट्रल मिनिस्ट्री इथे आपण काम करत आहोत असे सांगून पीडितेस आपल्या जाळ्यात ओढले होते.

चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून निशांत रमेशचंद्र नंदवाणा (रा. किशनगंज राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 31 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यात आरोपीने वेळोवेळी विविध कारणे सांगून आपल्याकडून तब्बल २४ लाख रुपये घेतले असे पीडितेचे म्हणणे आहे .
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीची शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख झाली होती. अधिकांश शिवप्रकाश अग्निहोत्री असे बनावट नावाने आरोपीचे अकाऊंट होते आणि आपण सेंट्रल मिनिस्त्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर्समध्ये नोकरीला असल्याचे सांगितले . आरोपीने फिर्यादी सोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 24 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे.


Spread the love